एआय मॅडम देतायत विद्यार्थ्यांना धडे

मुंबई: अन्य क्षेत्रांप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातही आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ने पाय ठेवले आहे.केरळमधील विद्यार्थ्यांना एआय मॅडम शिकवत आहे. एआयच्या मदतीने धडे गिरवत असलेले केरळ हे हिंदुस्थानातील पहिले राज्य ठरले आहे.

यासाठी ह्युमनॉइड रोबोटचा वापर केला जात आहे.जेनेरेटिव एआय शाळेतील शिक्षिकेला गेल्या महिन्यात सहभागी करून घेतले असून ही शिक्षिका विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. केरळच्या तिरुवनंतपुरमच्या केटीसीटी हायर सेपंडरी स्कूलमध्ये साडी परिधान करून विद्यार्थ्यांना शिकवणाऱया या शिक्षिकेचे नाव आयरिस असे आहे. मेकरलॅब्स एडुटेकच्या माहितीनुसार, आयरिसला तीन भाषा अवगत आहेत. विद्यार्थ्यांच्या कठीण प्रश्नांची उत्तरेही शिक्षिका तत्काळ देत आहे. आयरिसचे नॉलेज मूळ चॅटजीपीटीसारख्या प्रोग्रामिंगने बनवले आहे. भविष्यात एआय शिक्षिकांची संख्या वाढविण्याचा विचार आहे.