कोल्हापूर लोकसभेचा तिढा सुटला पण…

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेचा तिढा सुटलेला असून ही जागा छत्रपती शाहू महाराज यांनी लढवावी, याबाबत ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमत झाले आहे. मात्र, त्यांनी कोणत्या पक्षाकडून ही निवडणूक लढवावी, याबाबतचा कोणताही निर्णय न झाल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडीमधला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून करण्यात आला आहे. तिन्ही पक्षांनी शाहू महाराज छत्रपतींनी निवडणूक लढवावी असे ठरवल्याचे नाना पटोलेंनी सांगितले. पण शाहू महाराज छत्रपतींनी कोणत्या चिन्हावर लढावे हे ठरले नसल्याचेही नाना पटोलेंनी सांगितले आहे. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मात्र ही जागा शिवसेनेची असून शाहू महाराज छत्रपतींशी कुठलीही चर्चा झालीच नसल्याचे म्हंटले आहे. ज्यामुळे कोल्हापूरच्या जागेवरून अजूनही मविआत संभ्रम असल्याचे चित्र दुसरीकडे यला मिळत आहे.