सर्व दिलं तरी पाठित वार: उद्धव ठाकरे

मुंबई: “गद्दाराच्या नायकाला विचारा मी असं काय दिलं नव्हतं? सर्व दिलं तरी पाठित वार केला. याने दाढी खाजवण्यासाठी देखील लोकं ठेवलेले असतील इतका पैसा आहे. घोड्यावर बसलो म्हणजे यांना वाटतं घोडा माझा, मात्र घोडा कसा लाथ मारतो ते बघा”, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. पनवेल येथे ठाकरेंच्या शिवसेनेची जनसंवाद सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ही जागा आपल्याला जिंकावीच लागेल. एकाबाजूला छत्रपतींचे जन्मस्थान आणि दिसरीकडे राजधानी आहे. आपला हक्काचा भगवा फडकणार नाही तर कोणता फडकणार ? कदाचित भाजपचं सरकार आलं तर ही शेवटी निवडणूक ठरेल. पुन्हा येणार पुन्हा येणार म्हणतायत, ते केंद्रवाले पण म्हणतायत पुन्हा येईन पण काही येत नाहीत. संकटात साथ देणाऱ्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात. इथल्या खासदाराला आडवा करायचाच. पण जे सर्वपक्षीय शेठ आहेत, दुकान चालवणारी ही लोकं आहेत त्यांची दुकानं बंद करायची आहेत, असेही ठाकरेंनी स्पष्ट केले.

🤙 9921334545