रोज अनवाणी गवतावर चाललात तर आरोग्याला अप्रतिम असे फायदे मिळतात तर याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊया.
सकाळी गवतातून अनवाणी चालणे हे शरीरासाठी वेगवेगळ्या बाबतीत फायदेशीर ठरू शकते. सकाळी गवतातून चालणे ही एक प्रकारची थेरपी आहे. याला इंग्रजीमध्ये ग्रीन थेरपी असे म्हणण्यात येते.तसंच हिरव्या गवतावर चालल्यामुळे पायाखाली असणाऱ्या नसा अधिक सक्रिय होतात आणि मेंदूपर्यंत संकेत पोहचविण्याचे काम करतात. ज्यामुळे अंगावर येणारी अलर्जी निघून जाण्यास मदत मिळते.
सकाळी सकाळी तुम्ही अनवाणी गवतामध्ये चालण्यामुळे शरीराला अधिक फायदा मिळतो. डोळ्यांवर याचा डायरेक्ट परिणाम दिसून येतो. जेव्हा तुम्ही अनवाणी गवतावर चालता तेव्हा तुमच्या पायाच्या तळव्यावरील एक्युप्रेशर पाँईंटवर दबाव येतो आणि हा पाँईंट शरीरावरील अवयवांना अधिक प्रभावित करताना दिसून येतो. यामध्ये आपल्या डोळ्यांचाही समावेश आहे. योग्य दबाव पडल्यामुळे डोळ्यांची दृष्टी अधिक चांगली होण्यास मदत मिळते.