आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य, जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : सुसंवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

वृषभ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

तूळ : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : महत्त्वाची जबाबदारी येईल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

धनू : प्रवास शक्यतो टाळावेत. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

कुंभ : हितशत्रूंचा त्रास संभवतो. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.