आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य, जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्‍चिक : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

धनू : वादविवाद टाळावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

मीन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.