भगवान शंकराची पूजा करण्यासाठी जास्त प्रमाणात बेलाच्या पानांचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का? बेलाची पाने ही आपल्याही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तर जाणून घ्या बेलाच्या पानाचे फायदे.
बेलाच्या पानातील असणारे विटामिन सी हे प्रतिकारशक्ती अधिक बळकट करण्यासाठी मदत करते. यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी बेलाची २-३ पाने चावावीत. यामुळे प्रतिकारशक्ती वाढून सर्दी आणि खोकल्यासारख्या आजारांपासूनही दूर राहण्यास मदत मिळते.
बेलाच्या पानात आढळणारे अँटीऑक्सिडंट हे हृदय रोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. रोज सकाळी उपाशीपोटी बेलाच्या पानाचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत मिळते. आयुर्वेदानुसार, बेलाच्या पानाचा रस प्यायल्यामुळे श्वासासंबंधित आजारही बरे होतात. याशिवाय ब्लड प्रेशर रोखण्यासही याची मदत मिळते.
भगवान शंकराची पूजा करण्यासाठी जास्त प्रमाणात बेलाच्या पानांचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का? बेलाची पाने ही आपल्याही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तर जाणून घ्या बेलाच्या पानाचे फायदे