टोमॅटोच्या आडून परदेशात कांदा तस्करी

मुंबई: कांदा तस्करी जोरात सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. मोठ्या कंटेनरमधून टोमॅटोच्या आडून परदेशात कांदा तस्करी होत असल्याची घटना मुंबई येथे समोर आली आहे.

साधारणपणे 82.93 मेट्रिक टन कांदा या कंटेनरमधून संयुक्त अरब अमिराती या देशात पाठवला जाणार होता. मात्र, त्याआधीच मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील सीमा शुल्क विभागाने या कंटेनरवर कारवाई केली आहे.दरम्यान, हा कंटेनर नाशिकमधील दोन निर्यातदारांकडून संयुक्त अरब अमिराती या देशात पाठवला जाणार होता. मात्र, नागपूरच्या सीमाशुल्क विभागाला याबाबत आधीच माहिती मिळाली होती.

त्यानुसार सापळा रचत नागपूरचे सीमा शुल्क विभागाचे अधिकारी मुंबईला पोहचले, त्यांच्याकडून मुंबईत येथे या कंटेनरची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी कंटेनरमध्ये मागील बाजूस टोमॅटोची खोकी तर कंटेनरच्या शेवट पुढील भागात खोक्यांच्या आडून, कांद्याच्या गोण्या लपवण्यात आल्या होत्या. या कंटेनरमध्ये या गोण्यांमध्ये एकूण 82.93 मेट्रिक टन कांदा असल्याची नोंद सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. हा संपूर्ण कांदा जप्त करण्यात आला आहे.