वजन कमी करताना ग्रीन टी घेणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय मानला जातो. असे असले तरीही तो कधी, केव्हा आणि कसा घ्यावा हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तर जाणून घ्या ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती?
अभ्यासानुसार, ग्रीन टीमुळे वजन कमी तर होतेच पण आरोग्य सुधारण्यासही मदत होते. आठ आठवड्यांसाठी, प्राण्यांचा एक मोठा गट दोन गटांमध्ये विभागला होता. अर्ध्या प्राण्यांनी चरबी वाढवण्यासाठी तयार केलेला उच्च चरबीयुक्त आहार घेतला आणि अर्ध्यांना नियमित आहार देण्यात आला. तसेच प्रत्येक गटात, अर्ध्या प्राण्यांना त्यांच्या जेवणासह ग्रीन टीचा अर्क देण्यात आला.
सर्व प्राण्यांसाठी शरीरातील चरबीयुक्त ऊतींचे वजन, इन्सुलिन प्रतिरोध आणि इतर घटक मोजले गेले.यातील सर्वेक्षणानुसार ज्या उंदरांना ग्रीन टीसह उच्च चरबीयुक्त आहार देण्यात आले होते, त्यांच्या शरीराचे वजन ग्रीन टी न घेतलेल्या उंदरांपेक्षा 20 टक्के कमी होते तसेच त्यांचा इंसुलिन प्रतिरोधही कमी होता.
ग्रीन टी हा पाण्यासारखा पिणे अजिबात योग्य नाही, ते आहारासाठी घातक ठरु शकते. उंदरांना ज्याप्रमाणे दिवसभरात आहारासोबत थोड्या प्रमाणात ग्रीन टी दिला, तसा तो घेणे आरोग्यासाठी चांगले असते. मध्यम आकाराच्या कपांपेक्षा जास्त ग्रीन टी पिणे योग्य नाही.