मुंबई – कोल्हापूर धावणार अतिजलद एकेरी विशेष गाडी

कराड : मध्य रेल्वेच्या वतीने येत्या मंगळवारी दि. २० रोजी एकच दिवस मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस दरम्यान अतिजलद एकेरी विशेष गाडी सोडली जाणार आहे.

सदरची माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य गोपाळ तिवारी यांनी येथे दिली आहे. तिवारी म्हणले, मध्य रेल्वेच्या पुणे विभागांतर्गत येणाऱ्या पुणे -मिरज-कोल्हापूर दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे काम दिवसेंदिवस प्रगतीपथावर आहे.त्यामुळे या मार्गावरील प्रवाशी गाड्यांची संख्याही वाढविण्याची मागणी होत असतानाच मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने गाडी क्रमांक ०१०९९ ही येत्या मंगळ. २० रोजी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला १७ आईसीएफ कोच जोडण्यात येणार असून, यामध्ये एक वातानुकूलित द्वितीय, चार वातानुकूलित तृतीय,आठ शयनयान,दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह चार जनरल सेकंड क्लास कोच असणार आहेत.या गाडी क्रं ०१०९९ एकमार्गी विशेष गाडीसाठीविशेष शुल्कावर बुकिंग शुक्र.१६ फेब्रुवारी रोजीपासून सर्व पीआरएस स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहनही रेल्वे प्रशासनाकडून या पत्रकात करण्यात आले आहे.