थंडीतल्या फळात (संत्री, आवळा, पेरू, सीतापळ, बोरं) अँटी ऑक्सीडेंट व व्हिटॅमिन सी असते. ही सत्वे आपले अल्ट्रा व्हायोलेट किरणे व इतर कितीतरी प्रकारच्या आजारांपासून आपले रक्षण करतात. शरीर रोगमुक्त ठेवण्यासाठी ह्या जीवनसत्वांचे अगदी थोडे प्रमाणच आवश्यक असते. पण यांच्या कमतरतेने शरीराच्या अनेक क्रिया थांबतात. जस े ‘एमजी’च्या कमतरतेमुळे शरीर ‘ सीए’ शोषून घेऊ शकत नाही ‘ एनए’ व ‘के’ शरीरात पाण्याचे संतुलन राखतात ‘ सीयू’ मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक त र ‘एमएन’, ‘झेडएन’ शरीराची वाढ व विकासासाठी महत्वाचे. क्रोमियम शरीरात ग्लूकोज पातळी संभाळण्यासाठी गरजेचे. थंडीत मिळणार्या फळात वरील सर्व घटक योग्य प्रमाणात असतात जी शरीराला निरोगी ठेवण्यासाठी गरजेचीच आहेत.निसर्गानेच खूप विचार करून प्रत्येक ऋतूत वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवले आहेत. म्हणूनच मोसमी फळांचा आहारात समावेश हवाच.