महाराष्ट्र ग्रंथ भांडार ८८ वा वर्धापनदिन; वाचक टिकविण्यासाठी आणि नवीन घडविण्यासाठी अनोखी संकल्पना

कोल्हापूर: पुस्तकांची निर्मिती, प्रकाशन आणि विक्री या व्यवसायात कार्यरत असलेल्या महाद्वार रोड येथील महाराष्ट्र ग्रंथ भांडार ८८ वा वर्धापनदिन साजरा करत आहे. या वर्धापनदिनाचे औचित्य साधून वाचक टिकविण्यासाठी आणि नवीन घडविण्यासाठी अनोखी संकल्पना जाहीर केली आहे. या अंतर्गत १६ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत पुस्तके भेट स्वरुपात स्वीकारण्यात येणार आहेत आणि संकलित पुस्तके शाळा व वाचकप्रेमींना देण्यात येणार आहेत.

‘सुजाण वाचक टिकविण्याबरोबर नवीन वाचक घडविण्यासाठी शुक्रवारपासून २९ फेब्रुवारीपर्यंत पुस्तकांचे संकलन केले जाणार आहे. सायंकाळी ६ वाजता ग्रंथ भांडार येथे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांच्या हस्ते ‘अवनि’च्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांना देणगीस्वरुपात पुस्तके भेट देऊन उपक्रमाला सुरुवात होणार आहे. या उपक्रमांतर्गत काही शाळा किंवा गरजवंत संस्थांना ही पुस्तके देण्यात येतील.” असेही कुलकर्णी म्हणाले.