एका दिवसात किती बदाम खावेत?

बदाम हा अतिशय आरोग्यदायी आणि पौष्टिक ड्राय फ्रुट आहे. तर जाणून घेऊया एका दिवसात किती बदाम खाण्यासाठी आरोग्यदायी आहेत

रोज बदाम खाणे आरोग्यासाठी चांगले असते हे सगळ्यांचं माहिती आहे. पण हा प्रश्न पडतो की रोज बदाम दिवसात किती आणि कसे खावेत? याबद्दल आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार सांगतात की, प्रत्येकाची पचनसंस्था आणि गोष्टी पचवण्याची क्षमता वेगळी असते.

यामुळे फार विचारपूर्वक तुमचं डाएट असावेत. रोजच्या आहारात बदामाचा समावेश करण्याचा प्रश्न आहे, जर तुम्ही पहिल्यांदाच बदाम खात असाल तर तुम्ही फक्त २ बदाम पाण्यात भिजवलेले खाणे चांगले ठरेल. बदामाची साल काढून खा.जेव्हा तुम्हाला १० दिवस २ बदाम खाण्यास सोयीस्कर वाटत असेल आणि पचनाची कोणतीही समस्या नसेल, तेव्हा तुम्ही ५ बदाम खाणे सुरू करू शकता.