
गडहिंग्लज : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गडहिंग्लजमधील ईव्हीएम स्ट्राँगरूम, पाचपेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या भडगावातील मतदान केंद्र, मतदान साहित्य देवघेवीचे केंद्र एम. आर. हायस्कूलला भेट देवून पाहणी केली. यावेळी शंभर वर्षांवरील मतदारांना मतदानासाठी केंद्रापर्यंत घेऊन येण्याची व्यवस्था करण्यासह प्रशासनातर्फे त्यांचा सन्मानही करावा’, अशी सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना केली.

प्रत्येक गावातील ८० वर्षांवरील मतदारांबाबत विशेष मोहीम राबवून स्वतंत्र यादी तयार करावी. त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची व्यवस्था करण्याची सूचना येडगे यांनी बीएलओ यांना सांगितले. भडगाव येथील केंद्रशाळेतील सहाही मतदान केंद्रांची त्यांनी पाहणी केली. तहसीलदार ऋषिकेत शेळके, तलाठी रूपाली कांबळे यांनी मतदान केंद्राची माहिती दिली.