
आळंदी : पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे देवेंद्र फडणवीस हे गीता भक्ती अमृत महोत्सव उपस्थिती होते. देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना कोण संजय राऊत? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी गुंडाची परेड काढली होती. ज्या पद्धतीने पत्रकार निखली वागळेंवर हल्ले करणारांची परेड काढणार का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केल आहे.
या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कोण संजय राऊत? ते कोण आहेत? ते फार मोठे नेते आहेत का? योग्य नेते असतील तर, त्यांच्याबद्दल मला विचारायचे. संजय राऊत यांच्याबद्दल काय विचारताय? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना विचारला आहे.