
मुंबई: राजकारणात एक मोठी घडामोडी घडली असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेला मोठा धक्का दिला आहे. मनसेचे पदाधिकारी आणि तब्बल 3500 माथाडी कामगार आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

मनसेचे माथाडी कामगार सरचिटणीस महेंद्र जाधव, सरचिटणीस सुमंत तारे, उपाध्यक्ष उमेश कुलकर्णी यांच्यासह तब्बल तीन हजारांपेक्षा अधिक माथाडी कामगार आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.विशेष म्हणजे मनसे यावेळी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पक्षाकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. मात्र अशावेळी हा पक्षप्रवेश होत असल्यानं मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबईतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलबारहिल मधील आनंदवन बंगल्यावर माथाडी कामगारांचा हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे.