आकोला : जिल्ह्यात आपल्या मुलानं अनुसूचित जाती वर्गातील मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरुन वडिलांनीच पोटच्या मुलाला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अकोल्यातील टिटवा गावात शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास संदीप गावंडे याचा राहत्या घरात हातपाय बांधून असलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला.
दरम्यान संदीपच्या घरातील सर्वजण बाहेरगावी गेले होते. घरातील लोक आज दुपारी घरी परतले असता त्यांना घरात संदीप मृत अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी एकच टाहो फोडला. याची माहिती पिंजर पोलिसांना देण्यात आली आणि पिंजर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी पंचनामा करून तपासा दरम्यान वडिलांनीच मुलाची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे.