बहिरेश्वर-कोगे दरम्यानचे अतिक्रमण काढूनही अद्याप के.एम.टी बीडशेड मार्गावरूनच चालू..

बहिरेश्वर : करवीर तालुक्यातील मौजे बहिरेश्वर हे गाव कोल्हापूर शहरापासून सर्वसाधारण 17 किलो मीटर अंतरावर वसलेले आहे. येथूऩ दररोज शहराला भाजीपाला, दूध तसेच कागल एम आय डी सीला जाणारा कामगार वर्ग, उच्चशिक्षणासाठी विद्यार्थी वर्गाला सोयीची वाहतूक व्यवस्था व्हावी म्हणून इ.स‌ 2007साली तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने खासदार धनंजय महाडिक यांच्या सहकार्याने कोल्हापूर कोगे व्हाया बहिरेश्वर अशी के एम टी बसची वाहतुक सुरू केली होती.

ती सर्वसाधारण सन 2022 सालापर्यत कोगे मार्गावरून सूरळीत सूरु होती पण खडक कोगे बंधारा नादुरूस्त झालेने अवजड वाहतूकीसह के एम टी बस वाहतुक बंद करून ती बीड शेड व्हाया वळविणेत आली त्यामूळे म्हारूळ बहिरेश्वर गावातील येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना वाढलेल्या तिकिटाचा फटका बसू लागला आहे. 2023 साली पाटबंधारे विभागाने खडक कोगे बंधारा दुरूस्ती करून घेतला आहे तसेच बहिरेश्वर व कोगे ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांनी दुतर्फा केलेले अतिक्रमण काढून टाकले आहे.

माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी महापालिका आयुक्त यांची भेट घेवून बस चालू करावी अशी मागणी केली आहे तर बहिरेश्वर गावचे लोकनियुक्त सरपंच सौ वंदना निवृत्ती दिंडे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला आहे. अतिक्रमण काढण्यासाठी जयवंत हावलदार, ग्रामपंचायत सदस्य तानाजी गोदडे,अमित नाळे, आदींनी यात सहभाग नोंदवला.. कोगे बहिरेश्वर मार्गावरील अतिक्रमण निघाल्यामुळे रस्त्यांने मोकळा श्वास घेतला आहे दुतर्फा निघालेल्या अतिक्रमणामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे.