उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन

कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.

श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी अंदाजे 5 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या भवनातून सर्वसामान्यांची मंगलकार्य व इतर कार्य संपन्न होणार आहेत. तसेच या भवनात सैनिक पूर्व प्रशिक्षण वर्ग, स्पर्धा परीक्षा मागदर्शन केंद्र व सेंद्रीय शेती प्रशिक्षण केंद्र असणार आहे. सीमा भागातील नागरिकांसाठी हे भवन उपयुक्त ठरणार आहे.

यावेळी मठाधिपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी, वैद्यकिय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर पोलीस अधीक्षक (गडहिंग्लज) निकेश खाटमोडे- पाटील, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, अभियंता अभिजित चौगुले, नूलच्या सरपंच प्रियांका यादव, उपसरपंच प्रवीण शिंदे, ए.वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, जयसिंगराव चव्हाण, गुरुकुल मधील शिष्यगण मुरगेंद्र हिरेमठ, ईश्वर स्वामी, गणेश जंगम, शिवानंद स्वामी, कार्तिक हिरेमठ यांच्यासह अन्य मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.