कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागामध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजन करण्यात आले असून मंगळवार (दि. १३) ते गुरूवार (दि. १५) दरम्यान इलेक्ट्रॉनिक वेस्ट अँड सस्टेनेबल डेव्हल्पमेंट या विषयावर वेबिनार होणार आहे.
या वेबिनार आणि इलेक्ट्रॉनिक वेस्ट अँड मॅनेजमेंट केंद्राचे उदघाटन इलेक्ट्रॉनिक्स विभागात सोमवारी (दि. १२) होईल. वेबिनारची प्रत्यक्षात सुरूवात मंगळवारी होईल.त्यामध्ये ग्रीस सरकारच्या शैक्षणिक सल्लागार डॉ. रानिया लम्पाउ, न्यूझीलंडमधील अँरो संशोधन फौंडेशनचे डॉ. सीहम कफाफी, अशोक नलावडे मार्गदर्शन करणार आहेत. ई-कचऱ्याची समस्या जगाला भेडसावत आहे. त्या पार्श्वभूमीवर या वेबिनारचे आयोजन केले असल्याचे समन्वयक डॉ. एम. के. भानारकर यांनी सांगितले.