राज्यात मुलींना मोफत शिक्षण

कोल्हापूर: राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींच्या शिक्षणाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यात जून पासून ज्या मुलींच्या पालकांचे आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना मेडिकल असो की इंजिनिअरिंग जवळपास ६०० अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील यांनी ही घोषणा केली आहे. या योजनेत ६०० वेगवेगळे अभ्यासक्रम घेण्यात आले आहेत. इंजिनिअरिंग, मेडिकल सारख्या अभ्यासक्रमांना पालकांचे लाखो रुपये खर्च होतात. मेडिकलसाठी तर करोड रुपये लागतात. यामुळे सामान्य घरातील मुले शिकू शकत नव्हती. त्यांच्या आता शिक्षणाची दारे उघडणार आहेत.