अंबादास दानवे वरपे कुटुंबाच्या भेटीला ; शिंदे व ठाकरे गटात राडा

कोल्हापुर : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे कोल्हापुर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या कोल्हापूर दौऱ्यात शिंदे व ठाकरे गटात मोठा राडा पाहायला मिळाला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मारहाण केलेल्या वरपे कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी अंबादास दानवे थेट त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी ते घरी जात असताना राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी अंबादास दानवे यांना रोखलं.

“मी वरपे यांच्या घरी जाणार आहे. क्षीरसागर यांचे 200 कार्यकर्ते असोत किंवा 2 हजार कार्यकर्ते असू देत मी जाणार” असा पवित्रा अंबादास दानवे यांनी यावेळी घेतला होता. अंबादास दानवे यांनी दुपारीच कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना राजेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यामुळ झापल होत. यानंतर आता अंबादास दानवे हे थेट राजेश क्षीरसागर राहात असलेल्या इमारतीमधील त्यांचे शेजारी असलेल्या वरपे कुटुंबाच्या भेटीला पोहोचले. यावेळी राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला.