
पुणे: शहरात मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढली होती यामुळे राज्य शासनाने पुण्याची जबाबदारी अमितेश कुमार यांच्याकडे दिली. पुणे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी पुणे शहरात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यात आयुक्त अमितेश कुमार यांनी क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे.
पुण्यातील नामचीन गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेत क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे कुख्यात गुंड, रेकॉर्डवरील आणि झोपडपट्टी परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस ठाणे आणि पोलिस चौक्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सलग २ दिवस सुरू असलेल्या गुन्हेगारांच्या परेडमुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बळ मिळेल आहे
