
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार बारावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधी होणार आहे, तर दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च यादरम्यान होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली आहे.

दहावी आणि बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमी आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुख्य कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, योजना शिक्षणाधिकारी सुनिता शिरभाते आदी उपस्थित होते.
