कोल्हापुर : पुणे येथील रक्षालेखा प्रधान नियंत्रक कार्यालयामार्फत माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीरमाता व त्यांच्या अवलंबीतांच्या पेन्शन, ईसीएचएस, सीएसडी कॅंटीन व रेकॉर्ड आफिसेसमार्फत स्टॉल, सैन्य प्लेसमेंट नोड, पी.सी.डी.ए. पेन्शन प्रयागराज येथील अधिकाऱ्यांबाबतच्या अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी 15 व 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता मिल्खासिंग पार्क, कमाण्ड एम.टी. समोर, घोरपडी, पुणे कॅम्प येथे पेन्शन अदालत, वेटरन मेळावा घेण्यात येणार आहे.
माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीरमाता यांच्या अडीअडचणींबाबतच्या सविस्तर माहितीसाठी हेडक्वार्टर दक्षिण महाराष्ट्र व गोवा सब एरिया हेल्पलाईन नंबर 8484094601 व कर्नल वेटरन, महाराष्ट्र व गोवा सब एरिया मोबाईल नंबर 9545458913 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) राहुल माने यांनी केले आहे.