शेतकऱ्यांना धान व नाचणी खरेदीसाठी 29 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ…

कोल्हापुर : जिल्ह्यात शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत माहे डिसेंबर 2023 पासुन 9 धान खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरु असून शासनाकडून धान खरेदीसाठीची मुदत 31 जानेवारी ऐवजी 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

4 फेब्रुवारी 2024 अखेर जिल्ह्यातील 768 शेतक-यांनी 8492.81 क्विंटल धान व 129 शेतक-यांनी 1021.62 क्विंटल नाचणी (रागी) खरेदी केंद्रावर विक्री केली आहे. त्यामुळे धान व नाचणी विक्री करीता नोंदणी केलेल्या शेतक-यांना धान व नाचणी विक्रीसाठी दि. 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत शासन स्तरावरुन मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे खरेदी केंद्राचा एसएमएस आलेल्या शेतक-यांनी मुदतीत खरेदी केंद्रावर धान व नाचणी विक्री करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी केले आहे.