मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांबाबत तथ्यहीन आरोप करण्यासंदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली.
आमदार गणपत गायकवाड यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची आम्ही मागणी केली. मी ठाण्याचा पालकमंत्री आहे. यापूर्वी एकदाही गणपत गायकवाड यांनी त्यांचा विषय कधीच मांडला नाही. समन्वय समिती समोरही मांडला नाही. फडणवीस आमच्या मागणीची योग्य दखल घेतील याची आम्हाला खात्री आहे असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.