आमदार प्रकाश आबिटकर यांचे संपर्क कार्यालयात मार्गदर्शन कॅम्पचे आयोजन.

गारगोटी (प्रतिनिधी) : राधानगरी विधानसभा मतदार संघातील चर्मकार व मातंग बांधवांना विविध व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या विविध कर्ज योजनांची माहिती देण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ व चर्मकार महामंडळ तसेच अपंग महामंडळ यांचे वतीने विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. यामध्ये महामंडळाच्या व राज्य शासनाच्या योजना कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने 50 हजार ते 50 लाख रुपयापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. राधानगरी विधानसभा मतदार संघातील जास्तीत-जास्त लाभार्थ्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी केले. यावेळी अपंग महामंडळ व चर्मकार महामंडळाकडून मंजूर करण्यात आलेल्या 10 कर्जदारांना मंजूरी पत्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना चर्मकार जिल्हा व्यवस्थापक एन.एम.पोवार म्हणाले की, महामंडळ हे सन 2013 पासून बंद अवस्थेत होते ते पुर्ववत सुरू करावे अशी मागणी जिल्हा चर्मकार संघटनेने केली होती. त्या अनुषंगाने मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचेकडे महामंडळ पुर्ववत सुरू करावे अशी मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार महामंडळाचे कामकाज पुर्ववत सुरू झाले असून याकरीता 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती

यावेळी कर्जदारांनी कर्ज प्रकरणास जामीनदार देणेबाबत अडचण येत असल्याबाबत मुद्दा उपस्थित केला. याबाबत वरिष्ठ अधिकारी यांचे समवेत चर्चा करून मार्ग कढण्यात येईल.

यावेळी गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, राहूरी कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य दत्तात्रय उगले, कल्याणराव निकम, धैर्यशिल भोसले-सरकार, अशोकराव फराकटे, अशोकराव वारके, राजेंद्र चव्हाण, तानाजीराव जाधव, चर्मकार महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन.एम.पोवार, सतिश कांबळे, अनिल ढेरे यांच्यासह प्रमुख मान्यवर व चर्मकार व मातंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.