कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : उत्तर प्रदेश येथील मोलमजूरी करणारे राजू नागर यांची मुलगी प्रिया ( वय१२) या शालेय विद्यार्थिनीचा खेळताना पडल्याने उजवा हात कोपरातून फ्रॅक्चर झाला होता. गेली १३ जानेवारी पासून ती सी.पी.आर.हाॅस्पीटल मध्ये हेलपाटे मारत होती. यावेळी मलेरिया विभागाचे बाजीराव कांबळे व समाज सेवक अमोल कुरणे यांनी अधिष्ठाता डाॅ. प्रकाश गुरव यांच्याशी संपर्क साधला. अधिष्ठाता डाॅ. गुरव यांनी तात्काळ दखल घेउन पेशंटला अॅडमिट करून घेऊन संबधीत डाॅक्टरांना योग्य सूचना केल्या.
या मुलीच्या हातावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. जुना बुधवार पेठेतील सुप्रसिद्ध संजय फरसाणाचे मालक संजय पाटील यांनी औषध उपचाराची जबाबदारी स्वीकारली आहे.
