सीए डॉ. शंकर अंदानी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

अहमदनगर: अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सीए डॉ. शंकर अंदानी यांना जय युवा अकॅडमीच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या सावित्री ज्योती महोत्सवात शंकर अंदानी व राखी अंदानी यांना माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी स्वागताध्यक्ष सुहास सोनवणे, जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, पोपट बनकर, ॲड. सुनिल तोडकर आदी उपस्थित होते.

सीए अंदानी अनेक सामाजिक संस्था व व्यक्तींना सामाजिक भावनेने मार्गदर्शन आणि सहकार्य करत असतात. अंदानी यांचे नुकतेच भारतीय पोस्टाने 5 रुपयांचे पोस्ट स्टॅम्प प्रसारित केले आहे. युनायटेड नेशन अमेरिका राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान झाला आहे.

जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करुन त्यांनी आंतरराष्ट्रीय अवॉर्ड, राष्ट्रीय पुरस्कार, मानद डॉक्टरेट पदव्या मिळवल्या आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मागील 15 वर्षापासून ते श्री साई बाबा संस्थानाचे कर सल्लागार, तर 17 वर्षापासून अहमदनगर महानगरपालिकेचे आयकर सल्लागार आहेत.

521 सामाजिक संस्था मंदिराचे ते विनामूल्य आयकर सल्लागार म्हणून काम पाहत आहे. तर 65 गौशालाचे सल्लागार, 511 किसान उत्पादक कंपनीचे सल्लागार असून, आंतरराष्ट्रीय संघाचे ते महामंत्री आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.