खा. शशी थरुर यांचेआगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठं विधान…

नवी दिल्ली: काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठं विधान केलं आहे. ”भाजपला मागच्या वेळीपेक्षा कमी जागा मिळतील, त्यांच्या खासदारांची संख्या कमी होईल.” असा दावा थरूर यांनी केला.शशी थरुर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुन्हा पुढे येईल. मात्र त्यांच्या जागा लक्षणीयरित्या कमी होतील. 

राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA मधील घटकपक्षांचा भाजपवरुन विश्वास कमी होईल. भाजपचे घटकपक्ष त्यांचं समर्थन काढून घेवून विरोधी पक्षांना ताकद देण्याची शक्यता नाकारता येत नाहीत.थरुर यांनी सांगितलं की, जर इंडिया आघाडी राज्यांमध्ये जागांचं वाटप योग्य पद्धतीने करत असेल तर विरोधकांना पराजयापासून दूर ठेवलं जावू शकतं. 

केरळमध्ये सीपीआय आणि काँग्रेसमधील जागावाटपाचा तिढा सुटणं अवघड आहे.२०१९ मध्ये भाजपच्या नेतृ्त्वाखालील एनडीएने ३५३ जागांवर विजय मिळवला होता. आता एनडीएचं लक्ष्य ४०० जागांवर आहे. काँग्रेस आणि अन्य २७ पक्षांनी भाजपला आव्हान देण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये इंडिया आघाडीच्या जागावाटपावरुन चर्चा सुरु आहेत.

🤙 8080365706