कोजीमाशी पतपेढीवर आम.आसगावकरांचा झेंडा..

कोल्हापूर प्रतिनिधी:अत्यंत चुरशीच्या झालेल्या कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पातपेढीच्या निवडणूकित आम.जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू सत्तारुढ आघाडीने सर्वच्या सर्व जागा जिंकून पुन्हा सत्ता काबीज केली तर विरोधी शिक्षक नेते दादा लाड यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी सहकार आघाडीला एकही जागा मिळवता आली नाही.

या निवडणुकीच्या निमित्ताने गेली 15 दिवस वातावरण ढवळून निघाले होते. आम.जयंत आसगावकर व शिक्षक नेते दादा लाड यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक झाली होती. या पतपेढीवर आमदार आजगावकर यांची सत्ता होती या निवडणुकीत त्यांच्याच आघाडीने सर्वच्या सर्व जागा जिंकत 17-0 असा विजय प्रस्थापित केला. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते दोन्हीही आघाडी कडून आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते.

विजयी उमेदवार असे सर्वसाधारण गट गजानन दिनकर काटकर, राजेंद्र सदाशिव कारंडे, महादेव पांडुरंग चौगले, हिंदुराव तुकाराम डोंब , कृष्णात रामचंद्र पाटील ,खंडेराव हिंदुराव पाटील, दिलीप बाबुराव पाटील ,धनाजी गुंडू पाटील, सरदार विठ्ठल पाटील, सुनील कृष्णात पाटील, जयसिंग मारुती पोवार, शिवाजी बापूसो लोंढे ,महिला सभासद प्रतिनिधी – रेखा अजित रावराणे, सुप्रिया बापूसाहेब शिंदे. अनुसूचित जाती -जमाती सभासद प्रतिनिधी –
शानाजी विष्णू माने

इतर मागास प्रवर्ग सभासद प्रतिनिधी – उमेश शामराव माळी , भटक्या विमुक्त जाती जमाती अथवा विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी- विठ्ठल मारुती लटके
निकालानंतर विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली.