शिवसेना नेते आदित्य ठाकरे ९ जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर…

कोल्हापूर: शिवसेना नेते,युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. मंगळवार दि.९ जानेवारी रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता मिरजकर तिकटी येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक आयोजित केली होती.

यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की, आगामी निवडणुकांसाठी आदित्य साहेबांचा हा दौरा महत्वपूर्ण असणार आहे. त्यांच्या सभेमुळे शिवसैनिकांमध्ये नवउर्जा व चैतन्य पसरणार आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी या सभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन राजू यादव यांनी केले.

यावेळी उंचगाव प्रमुख दिपक रेडेकर यांनी सांगितले की, मंगळवार दि ९ जानेवारी रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता सर्व शिवसैनिकांनी उंचगाव प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र जमून सभेच्या ठिकाणी जायचे आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी येथे जमावे.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, दिपक रेडेकर, संतोष चौगुले, योगेश लोहार, कैलास जाधव, बाळासाहेब नलवडे, सचिन नागटीळक, शफीक देवळे, सूरज पाटील आदींसह शिवसैनिक उपस्थित होत

🤙 9921334545