कागल येथे श्रीराम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण,अक्षता वाटप कार्यक्रम उत्साहात..

कागल (प्रतिनिधी) : तमाम हिंदुस्थानच्या जनतेचे गेली अनेक वर्षे केवळ स्वप्नच ठरलेले आयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे स्वप्न येत्या 22 जानेवारीला सत्यात उतरत आहे.या मंदिराचा लोकार्पण सोहळा एक ऐतिहासिक सोहळा व्हावा अशी अपेक्षा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. त्या अनुषंगाने शाहूंच्या कागल नगरीत आज शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी घरोघरी जाऊन श्रीराम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण व अक्षता वाटप केले.

यासोबतच कागल नगरीमध्येही या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचेही निमंत्रण दिले.यावेळी त्यांच्यासोबत वीरेंद्रराजे घाटगे तसेच श्रीराम बाविक भक्त, नागरिक मोठ्या संख्येने होते. राजे समरजीतसिंह घाटगे यांनी या प्रसंगी नागरिकांच्या हातांवर श्रीराम बंधन बांधली.देशातील ऐतिहासिक, निमंत्रणाचा हा कार्यक्रम शहरातील नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादासह मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला.

  येथील मध्यवर्ती सुभाष चौकातून कलश पूजन व प्रभू श्रीराम आरतीचे निमंत्रण व अक्षता वाटपास सुरुवात झाली. 

निमंत्रण मार्गावर हारतुरे-यांनी सजवलेल्या उघड्या जीपमध्ये प्रभू श्रीराम- सीता-लक्ष्मण यांचा सजीव देखावा उभा केला होता. धनगरी ढोल वादन सोबत जय श्रीरामच्या घोषणा आणि रस्त्याच्या दुतर्फा घरांच्या गॅलरी मधून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे केलेली पुष्पवृष्टी हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले .नागरिकांच्या अलोट गर्दीत अत्यंत भक्तीमय वातावरणात कागल अधिपती श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या निमंत्रण सोहळ्याची सांगता झाली….

   

राजे समरर्जीतसिंह घाटगे
यावेळी प्रतिक्रिया देताना राजे समरजीतसिंह घाटगे म्हणाले ऐतिहासिक कागलमध्ये अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम असून महिला,युवा, ज्येष्ठ – श्रेष्ठ, आबालवृद्ध आणि पारंपरिक वेशात युवती या सोहळ्यात उत्साहात सहभागी होत्या. त्यांच्यातील उत्साहाने अक्षरशः आम्ही भारावून गेलो.विशेष म्हणजे निमंत्रण मार्गावर एका सामान्य धनगर समाज बंधुच्या दारात शाहू कारखान्यास पुन्हा ” नंबर एकचे बक्षीस ” मिळालेची शुभ वार्ता समजली. वास्तविक या शुभ संकेतावरून आम्हाला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळाला असून आम्ही चांगले काम करीत असलेची ती एक पोचपावती आहे असे आम्ही मानतो..

🤙 9921334545