गारगोटी (प्रतिनीधी) : स्थानिक टेनिस क्रिकेटपटूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. ग्रामीण भागात असंख्य अष्टपैलू खेळाडू असून त्यांना संधी दिल्यास राज्य व राष्ट्रीय पातळीवरती खेळण्याची क्षमता असलेले खेळाडू निर्माण होतील असा विश्वास प्रा.अर्जुन आबिटकर यांनी व्यक्त केला.
ते अल्पावधीतच भुदरगड तालुक्यासह कोल्हापूर जिल्हयामध्ये चर्चेत आलेल्या गारगोटी प्रिमिअर लिग (GPL) स्पर्धा 2023 च्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुआप्पा देसाई, संचालक पी.बी.पाटील, बाजीराव चव्हाण आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.आबिटकर म्हणाले की, तालुक्यातील युवकांना वाव मिळावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून गारगोटी प्रेमिअर लिगचे आयोजन संयोजकांच्या वतीने केले जाते. ग्रामीण भागात असंख्य अष्टपैलू खेळाडू असून त्यांना संधी दिल्यास राज्य व राष्ट्रीय पातळीवरती खेळण्याची क्षमता असलेले खेळाडू निर्माण होतील. ही स्पर्धा घेण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्या सर्वांनी मदत केली त्यासर्वांचे आभार मानले.
यावेळी मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुआप्पा देसाई, संचालक व प्राचार्य डॉ.पी.बी.पाटील, शासन नियुक्त प्रतिनिधी व संयोजक कमिटीचे अध्यक्ष बाजीराव चव्हाण, कर्मचारी प्रतिनिधी अरविंद चौगले , शिवसेना तालुकाप्रमुख संग्रामसिंह सावंत, माजी उपसरपंच अरुण शिंदे, उपसरपंच सागर शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य खेगडे , सर्जेराव मोरे, मनोहर परीट, रणधिर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत भोई, भरत शेटके, संदीप देसाई, दिपक देसाई, बाबासाहेब चव्हाण, दिपक मोरे , विजय सारंग, अजित चौगले, जितेंद्र भोसले, सचिन पिसे, एस.के.शिंदे, कुलदिप कामत, दशरथ राऊत यांच्यासह प्रमुख मान्यवर व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.