कोण ओबीसी कोण मराठा हे म्हणायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला…? खा. उदयनराजे भोसलेंचा सवाल

सातारा : आपण सर्वजण एकत्र राहिलो नाही तर देशाचे तुकडे होती. आता विदर्भवाले स्वतंत्र राज्याची मागणी करत आहेत. उद्या खानदेशवाले मागणी करतील. त्यानंतर कोकणवालेही म्हणतील स्वतंत्र कोकण द्या, असे झाले तर महाराष्ट्राचे तुकडे होतील आणि आपल्याला आपल्याच राज्यात जायला पासपोर्ट मागायला लागतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण, राम मंदीर उद्‌घाटन, सातारा लोकसभा आदी विषयांवर भाष्य केले. ओबीसी आणि मराठा समाजात दुफळी निर्माण होत आहे, या प्रश्नावर उदयनराजे बोलत होते. ते म्हणाले, मी जात-पात मानत नाही.कोण ओबीसी कोण मराठा हे म्हणायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. प्रत्येकजण आपापल्या कर्तृत्वावर मोठा झालेला असतो. 

छत्रपती शिवाजी महाराज काय होते, हे सर्वांना माहिती आहे. आपण सर्वजण एकत्र राहिलो नाही तर देशाचे तुकडे होती. आता विदर्भवाले स्वतंत्र राज्याची मागणी करत आहेत. उद्या खानदेशवाले मागणी करतील, त्यानंतर कोकणवालेही म्हणतील स्वतंत्र कोकण द्या.