कागल : प्रतिनिधी आयोध्येत प्रभू श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना येत्या 22 जानेवारी रोजी होत आहे. त्यानिमित्ताने येथील श्रीराम मंदिरामध्ये देखील येत्या 20,21,22 जानेवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन हा कार्यक्रम लोकोत्सव व्हावा अशा तऱ्हेचे भव्य नियोजन केले आहे.
या पार्श्वभूमीवर कार्यक्रमांचे निमंत्रण कागल शहरवासीयांना देण्यासाठी दि.5 जानेवारी ( उद्या ) रोजी मी स्वतः व राजे वीरेंद्रसिंह घाटगे अक्षता कलशासोबत घरोघरी जाऊन अक्षता,निमंत्रण पत्रिका देणार आहेत.अशी माहिती राजे समरर्जीतसिंह घाटगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
या कार्यक्रमाच्या प्रातिनिधिक स्वरूपात निमंत्रण देण्याची सुरुवात येथील सुभाष चौक-महालक्ष्मी हाॅल- धनगर गल्ली येथून बापूसाहेब महाराज चौक अशी आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते येत्या 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजून 20 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर आयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.या मंगलमय सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील श्रीराम मंदिर कागल मध्ये देखील विविध भक्तिमय,धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या कार्यक्रमात संपूर्ण शहरवासीयांनी सहकुटुंब आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी प्रभू श्रीराम मंदिराची उभारणी करून तमाम कागल वासियांच्या धार्मिक भावनांचा आदर केला.तथापि आयोध्येतील नियोजित प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या मंगलमय सोहळ्याची जय्यत तयारी कागल येथेही करण्यात आली आहे. या निमित्ताने आज घाटगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना निमंत्रण दिले.यावेळी ना.फडणवीस यांनी कागल मध्ये होत असल्या या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.