अक्कलकोट स्वामींच्या पालखीचे करवीर तालुक्यात आगमन … रजपूतवाडीत दर्शनासाठी गर्दी

प्रयाग चिखली( वार्ताहर) :अक्कलकोट स्वामी समर्थ पादुका परिक्रमा पालखीचे गुरुवारी करवीर तालुक्यात प्रथमच रजपूतवाडी येथे आगमन झाले. यावेळी येथील ग्रामस्थ तसेच शेकडो भाविकांनी दर्शनासाठी गर्दीने दर्शन घेतले

गेली सत्तावीस वर्षे महाराष्ट्रामध्ये या पालखी पादुका परिक्रमा काढण्यात येते. सोलापूर येथून 25 नोव्हेंबरला सुरू झालेली पालखी परिक्रमा 201 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिक्रमा करून 12 जून ला अक्कलकोट येथे पोहोचणार आहे. पालखी सोहळ्याचे मुख्य संयोजक संतोष भोसले हे आहेत. (पालखी सोहळा संपर्कासाठी फोन नंबर 8558855675)
रजपूतवाडी येथील स्वामी समर्थ ग्रुप च्या वतीने नीट- नेटके नियोजन व पालखीचे स्वागत करून महाप्रसाद वाटण्यात आला

दरम्यान आज गुरुवारी सायंकाळी पालखी सोहळा निगवे दुमाला येथे तर शुक्रवारी हनुमंतवाडी-चंबुखडी येथे असून शुक्रवारी ( दि 29 डिसेंबर) रोजी सायंकाळी लाड चौक येथील प्रल्हाद चव्हाण मुक्कामी विसावणार आहे त्यानंतर तीन दिवस दोन जानेवारीपर्यंत पालखी कोल्हापुरात ठीक ठिकाणी परिक्रमा करुन शहरा बाहेर मार्गस्थ होणार आहे भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

🤙 9921334545