शासकीय कामात अडथळा निवडे येथे एक जणावर गुन्हा दाखल

साळवण ( एकनाथ शिंदे)निवडे येथील महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ कर्मचारी अमोल मारुती मोरे रा . बालेवाडी व शिकावू कर्मचारी सौरभ संभाजी कोटकर हे निवडे येथील पाणवठा वाटेजवळील जळलेल्या डिपी जंपचे काम करत असता निवडे येथील तरुण दादासो कृष्णात पाटील हा तेथे आला व त्याने काम करण्यास मज्जाव करत वरीष्ठ अधिकाऱ्याना बोलवा नाहीतर काम बंद करा म्हणत शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली .
त्यात सौरभ कोटकर हे जखमी झाले. शासकीय कामात अडथळा आणल्याबाबतची तक्रार अमोल मोरे यांनी गगनबावडा पोलिसांत देत तिघाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

🤙 9921334545