अनाधिकृत नळ जोडणी १९ कॉलनीला पाणी पुरवठा बंद, विभागाचा अजब कारभार.

बालिंगा: (प्रतिनिधी )फुलेवाडी रिंग रोड पश्चिम बाजुला नागरी लोकवस्ती झपाट्याने वाढत चालली आहे. जवळपास १९कॉलनी वसल्या आहेत हा सगळा भाग शहरालगतच असुन उपनगराचाच भाग असल्याची वस्तुस्थिती आहे परंतु हा शैजारील भाग ग्रामपंचायत हद्दीत येत आहे.

गेली वीस वर्षांपासून या भागात पाणी पुरवठा हा कोल्हापूर महापालिकेच्या वतीने केला जात आहे. या माध्यमातून महानगरपालिकेला आर्थिक उत्पन्न होत आहेच, पण वाढती लोकसंख्या व नव्याने उभ्या रहात असलेल्या वसाहतीत वाढ होत असल्याने कोल्हापूर महानगरपालिका पाणि पुरवठा विभागाने या परिसरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करीत आहे. ईकडील नागरी वस्ती मध्ये बहुतांश नोकरदार कष्टकरी वर्गच वास्तव्यास आहे.

मध्यंतरी हद्दवाढ प्रस्ताव चालू झाला आणि शहराशेजारील ग्रामपंचायतनी हध्दवाढीस विरोध दर्शविला त्यामुळे असेल अथवा ईतर कारणांमुळे असेल महानगरपालिकेने १ सप्टेंबर २०२२ पासून नवीन नळ जोडणी या भागात बंद केली. पण या परीसरात रोहाऊसचे बांधकाम जोमाने सुरु आहे पण नविन नळ जोडणी मिळत नसल्याने खरेदीविक्री बंद पडल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने अनाधिकृत नळ जोडणी मोठृयाप्रमाणात जोडल्याचे महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे लक्षात आल्यावर अनाधिकृत नळ जोडणी शोध मोहीम गेली चार पाच दिवस राबवण्यात येत आहे. त्यामध्ये जवळपास शंभर चे आसपास नळजोडणी झाल्याचे उघडकीस आले असून त्यांना जागेवर पंचवीस हजार रुपये दंडाची नोटीस पाठवली आहे.

या मध्ये जिल्हा परिषद कॉलनी शेजारील आसपासचे कॉलनी मधील हे प्रकार उघडकीस आले आहेत, परंतु प्रसिद्धी माध्यमांनी जिल्हा परिषद कॉलनी मध्ये अनाधिकृत नळ जोडणी असे प्रसिद्ध केल्या मुळे कॉलनीची नाहक बदनामी होत असलेचे पत्रक सदर कॉलनीने काढले आहे तसे पाणी पुरवठा विभागाला कळविले आहे.

या काही थोड्या लोकांच्या चुकीमुळे महानगरपालिकेने १९कॉलनीचाच पाणी पुरवठा गेली चार दिवस बंद केल्याने नागरीकांची पाण्यासाठी आतोनात हाल होत असून पाण्यासाठी धावपळ होत आहे पीण्यास पाणी नसल्यामुळे लोक हवालदील झाली आहेत. थोड्या लोकांच्या चुकीमुळे महानगरपालिकेने सर्वच कॉलनीचे पाणी बंद करून प्रामाणिक पाणी बिल भरणा-यांना शिक्षा दिली असेच म्हणावे लागेल.

🤙 9921334545