थंडीपासून करा त्वचेचे असे रक्षण….

गेल्या दोन-तीन दिवसांपासून गारठा वाढला असून अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे त्वचा कोरडी होणे, खाज सुटणे, लाल होणे, पुरळ येणे अशा समस्या उद्‍भवू शकतात. याशिवाय ओठ फुटणे, टाचा भेगाळणे, केस कोरडे होणे असाही त्रास थंडीत होऊ शकतो.त्यामुळे आधीपासूनच त्वचेची काळजी घेणे आवश्‍यक असल्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. त्वचेची स्निग्धता टिकून रहाण्यासाठी सिद्ध केलेले तेल, आंघोळीसाठी हर्बल साबण, उटणे तसेच आहारात तूप, लोणी यांचा वापर करा.

गेल्या काही दिवसांपासून सकाळी हवेत गारवा जाणवू लागला अहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून  प्रदूषण व धुळीचे प्रमाण, हवेची गुणवत्ताही ढासळत आहे. अशा वेळी तवेची विशेष काळजी घेणे आवश्‍यक आहे. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची आणि सौंदर्याची काळजी घेणे आवश्‍यक आहे हिवाळा हा आरोग्यादायी मानला जातो. त्यामुळे हिवाळा सुरू होताच अनेकजण सकाळीच मॉर्निंग वाँक, योगासने करून वर्षभरासाठी उर्जा मिळवतात.

मात्र, थंडीमुळे त्यामध्ये हवा कोरडी असल्याने त्याचा परिणाम थेट त्वचेवर होतो. अशावेळी त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर विकार उद्‌भवू शकतात. हिवाळ्यात त्वचेची खास निगा घेणे आवश्यक आहे. थंडीत हवा कोरडी असल्याने त्वचेचा ओलावा कमी झालेला असतो. त्यामुळे त्वचेच्या समस्या उद्‍भवू शकतात. तसेच संतुलित आहार व योग्य ती पोषणमूल्यांचे सेवन केल्यास हिवाळ्यातही त्वचेचे आरोग्य राखण्यात मदत होऊ शकते, 

हिवाळ्यात आद्रता कमी असते. त्याचा परिणाम त्वचेवर होतो. अशा वेळी स्निग्धता टिकून रहावी यासाठीऔषधी तेलांचा वापर करावा. चेहऱयाला कुमकुमादी तेल लावावे. तर,संपूर्ण शरीराला ज्येष्ठमध, अनंत, शतावरी आदींनी सिद्ध केलेल्या औषधी तेलांचा वापर केल्यास शरीरातील स्नग्धता टिकून रहाते. हे तेल शरीरात खोलवर मुरते. परिणामी थंडीमध्ये शरीराला उष्णता मिळते व थंडीपासून काही प्रमाणात बचाव होतो. तसेच त्वचेवर थंडीचा परिणाम होत नाही. तसेच केसांना माकाल, ब्रह्मी आदी तेलांचे पोषण करावे. आहारात तेल, तूप यांचा समावेश असावा.

काही टिप्स 

हिवाळ्यात त्वचा मुलायम राहावी यासाठी सिद्ध केलेल्या तेलांचा वापर करावा

आहारात तूप, लोणी यांचा समावेश असावा.

केसांना माका, ब्रम्ही आदी तेलांचा वापर करावा.

गरम अन्नाचे सेवन करावे.

🤙 9921334545