बंगळूरू : कर्नाटक राजभवनात रात्री साडेअकराच्या सुमारास धमकीचा फोन आला होता. यात राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. यंत्रणा सतर्क करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरु केली.
फोन कोन केला याबाबत काही कळू शकलेले नाही. फोन कॉल आल्यानंतर बॉम्ब स्कॉडला पाचारण करण्यात आले. त्यानंतर राजभवन परिसरात शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सदर घटनेमुळे सुरक्षा यंत्रणाची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.