कोल्हापूर (प्रतिनिधी) राज्य पाणी व स्वच्छता मिशनतर्फे निबंध, चित्रकला, वक्तृत्व व जिल्हा स्तरावर लघुपट निर्मिती स्पर्धा होणार आहे. यात सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
निबंध व चित्रकला स्पर्धा १ ली ते ७ वी आणि ८ ते १० वी स्तरावर होईल. ११ डिसेंबरपर्यंत सर्व शाळांमध्ये स्पर्धा होतील. यानंतर तालुका आणि जिल्हा पातळीवर परीक्षण करून विजेते जाहीर केले जातील. दोन्ही गटांसाठी २१
हजार, ११ हजार व साडेपाच हजारांचे तिसरे बक्षीस आहे. ११ वी ते १२ वी व पदवीपर्यंत अशा दोन गटांत वक्तृत्व स्पर्धा होणार असून बक्षिसे मिळतील.
लघुपटनिर्मिती स्पर्धा होणार असून, अनुक्रमे ३१ हजार, २१ हजार आणि ११ हजार अशी बक्षिसे आहेत. लघुपट जिल्हास्तरावर २८ डिसेंबरपर्यंत जि. प. पाणी व स्वच्छता विभागाकडे किंवा sbmkolhapur@gmail.com यावर पाठवावेत, असे आवाहन माधुरी परीट यांनी केले आहे.