विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ठाकरे गटाच्या वकिलांवर नाराज…

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष नोंदवण्यात आली.सुरुवातीला शिंदे गटाच्या वकिलांनी शेवाळेंना प्रश्न विचारले. तर ठाकरे गटाच्या वकिलांना शेवाळेंची उलट तपासणी घेतली. उलटतपासणीवेळी तेच तेच प्रश्न ठाकरे गटाच्या वकिलांकडून विचारले गेल्यानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नाराज झाले. त्यांनी ठाकरे गटाच्या वकिलांना सुनावत पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारू नका असं म्हटलं.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे ठाकरे गटाच्या वकिलांवर सुनावणीवेळी चिडले. पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारु नका, ज्याची उत्तरे दिली आहेत अशा शब्दात राहुल नार्वेकर यांनी वकिलांना सुनावले. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत हे वारंवार आधी विचारलेलेच प्रश्न पुन्हा विचारत होते.

सुनावणीत काय झालं?

देवदत्त कामत – ही प्रथा 2010 पूर्वीपासून सुरू आहे की नंतर?

राहुल शेवाळे – मला माहिती नाही.

कामत – यापूर्वीच्या उत्तरात तुम्ही म्हटला की ही परंपरा बाळासाहेबांपासून सुरू आहे. याचा अर्थ ही परंपरा बाळासाहेब हयात असल्यापासून सुरू आहे का?

राहुल शेवाळे – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना या परंपरेचं पालन करण्यात आलं. 1998 रोजी घटनेतील amendment नंतर कोणत्याही प्रक्रियेचं पालन करण्यात आलं नाही.

देवदत्त कामत – मग तुम्हाला हे म्हणायचे आहे का की 1998 नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्याही प्रक्रियेचं (procedure) पालन केलं नाही?

राहुल शेवाळे – मी म्हटलं इतर प्रक्रिया. परंपरांचं पालन करण्यात आलं.

(यावरून दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी)

राहुल शेवाळे – मी कुठेच बोललो नाही की बाळासाहेब ठाकरे यांनी प्रक्रिया follow केली नाही.

(शिंदे गटाचा आक्षेप नोंदवला. प्रश्नात कोणती प्रक्रिया याबाबत स्पष्टता नाही. ब्राॅडली प्रश्न विचारला.)

कामत – मी तुम्हाला सांगू इच्छितो की, उद्धव ठाकरे नियमितपणे राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी सभेची बैठक बोलवत होते. हे बरोबर आहे का?

शेवाळे – नाही.

कामत – तुमच्या स्टेटमेंटमध्ये पॅरा 5 आणि 6 मध्ये तुम्ही म्हटलं आहे की पक्षाच्या सदस्यांमध्ये आणि कार्यालयीन सदस्यांमध्ये मविआ सरकारमध्ये भ्रष्टाचार असल्याबाबत तक्रार होती हे खोटं आणि बेसलेस आहे. हे बरोबर आहे का?

शेवाळे – नाही हे खरे नाही.

देवदत्त कामत – तुम्ही पॅरा सहा मध्ये म्हटलंय की काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने पक्षात अस्वस्थता होती हे तथ्यहीन आणि चुकीचं आहे. हे खरे आहे का?

शेवाळे – हे खरे नाही.

कामत – तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला पाठिंबा देता हे खरे आहे का?

शेवाळे – होय.

कामत – 23 नोव्हेंबर 2019 रोजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थनाने?

शेवाळे – होय. पण तारीख लक्षात नाही.

कामत – मी तुम्हाला सांगू इच्छितो की, देवेंद्र फडणवीस यांनी घाईघाईत अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापनेचा दावा केला जेणेकरून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये. हे बरोबर आहे का?

शेवाळे – नाही.

कामत – मग देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीविरोधात

शिवसेना राजकीय पक्ष सर्वोच न्यायालयात का गेले होते?

शेवाळे – मला माहिती नाही.

कामत – भाजपने शिवसेनेची निवडणूक पूर्व युती तोडली कारण महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री नको होता.हे खरे आहे का?

शेवाळे – माहिती नाही

कामत – भाजपविरोधात जाऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला. हे खरे आहे का?

शेवाळे – पॅरा 7 मध्ये तुम्ही म्हटलं की एकनाथ शिंदे यांनी पक्षाचं नेतृत्त्व करत सदस्यांच्या तक्रारींची गेयखल घेतला हे चूक आणि तथ्यहीन आहे. हे खरे नाही.

कामत – शिवसेना राजकीय पक्षाचे नेतेपदी निवड कधी झाली?

शेवाळे – तारीख लक्षात नाही.

कामत – तुम्ही अंदाजे तारीख सांगू शकता का?

शेवाळे – लक्षात नाही.