सुळे गावातील सभासदांचा श्री चाळोबा देव आघाडीला जाहीर पाठींबा

आजरा- आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे चुरस हि वाढू लागली असतानाच सुळे गावातील सभासदांनी श्री चाळोबा देव आघाडीला एकमुखी पाठिंबा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सुळे इथे झालेल्या सभेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

भावेश्वरी दूध संस्था ,श्री शाहू दूध संस्था पदाधिकारी, सेवा संस्था पदाधिकारी , सरपंच -उपसरपंच तसेच संदीप चव्हाण ,संभाजी रेडेकर, बाबू फडके, राजाराम जाधव, अपंगे यांनी ही पाठिंबा जाहीर केला. यावेळी उमेदवार व कारखाना चेअरमन सुनील शिंत्रे, अभिषेक शिंपी, सुनीता रेडेकर, उद्योगपती रमेश रेडेकर, सचिन शिंपी, अश्विनी डोंगरे यांच्यासह सभासद उपस्थित होते. सुळे गावच्या सभासदांनी जाहीर पाठिंबा दिल्याने आघाडीला ऊर्जा मिळाली असें कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

🤙 9921334545