सिंधुदुर्ग : ४ डिसेंबर २०२३ इ.रोजी तारकर्ली, मालवण येथे भारतीय नौसेना दिन संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या कार्यालयामार्फत उपस्थित जनतेसाठी आरोग्य पथकाद्वारे आरोग्य सेवा पुरवण्यात आलेली होती. या पथकामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र चौके येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर बापू मिठारी यांची नियुक्ती करण्यात आलेली होती.
त्या ठिकाणी उपस्थित राहून चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा दिल्याबद्दल डॉ. कुबेर बापू मिठारी यांना आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने गौरविण्यात आले यावेळी श्री. प्रजित नायर (मुख्य कार्यकारी अधिकारी- जिल्हा परिषद सिंधुदुर्ग), डॉ. सई धुरी( जिल्हा आरोग्य अधिकारी- जिल्हा परिषद सिंधुदुर्ग) यांच्या हस्ते गौरविण्यात आले.