कोल्हापूर (प्रतिनिधी) सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी म्ह्णून काम करताना २५ हजार रुपयांची लाच घेताना कारवाई झालेल्या तत्कालिन शिक्षणाधिकारी किरण आनंदा लोहार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर पाच कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रुपयेच्या किंमतीची भ्रष्ट मार्गाने जमविलेली मालमत्ता आढळूनआली आहे. सोलापूर येथे ऑक्टोबर २०२२ मध्ये त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती.
सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागााचे पोलिस निरीक्षक लुमाकांत महाडिक यांनी, सोलापूर सदर बझार पोलिस ठाण्यात किरण लोहार (वय ५० वर्षे), त्यांच्या पत्नी पत्नी सुजाता किरण लोहार (वय ४४ वर्षे), मुलगा निखिल किरण लोहार (वय २५ वर्षे) (शिक्षक कॉलनी पाचगाव, कोल्हापूर) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान सोलापूर येथील पोलिसांचे एक पथक कोल्हापुरातील पाचगाव येथील शिक्षक कॉलनी येथील लोहार यांच्या निवासस्थानी तपासणी करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.लोहार यांनी १५ नोव्हेंबर १९९३ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ठिकठिकाणी काम करताना वैध उत्पनापेक्षा १११.९३ टक्के जादा रक्कम अवैधरित्या जमविली आहे. लोकसेवक या नात्याने कर्तव्य करत असताना परिक्षण कालावधीमध्ये कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा भ्रष्ट व गैरमार्गाने मालमत्ता जादा मालमत्ता जमविली आहे. त्यांच्या कुटुबीयांतील सदस्यांच्या नावावरही ही मालमत्ता आढळते. या कारणास्तव लोहार, त्यांच्या पत्नी, व मुलगा यांच्या विरोधात गुन्हा नोंद केल्याचे पोलिस निरीक्षक लुमाकांत महाडिक यांनी सांगितले.
लोहार यांनी रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर अशा विविध ठिकाणी नोकरी केली आहे. त्यांनी भ्रष्ट मार्गाने ठिकठिकाणी मालमत्ता जमविल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यांची कोल्हापुरातील कारकिर्द वादग्रस्त ठरली होती. कोल्हापुरात माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून काम करताना त्यांच्या कामकाजाविषयी सर्वसाधारण सभेतही चर्चा झाली होती. सोलापुरात लाच घेताना सापडल्यानंतर लोहार यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयाने टीईटी घोटाळयातील मुख्य आरोपी तुकाराम सुप याच्या विरोधात पिंपरी चिंचवडच्या सांगवी पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल आहे. त्यांनी भ्रष्टाचारातून तीन कोटी ५९ लाख ९९ हजार रुपये कमाविल्याचा आरोप आहे. १९८६ ते २५ डिसेंबर २०२१ दरम्यान त्यांनी हे पेसे कमाविल्याचे म्हटले आाहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीराम विष्णु शिंदे यांनी तक्रार दिली आहे. सुपे यांच्या घरातून दोन कोटी ८७ लाख ९९ हजार रुपये रोख. तर १४५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. सोन्याच्या दागिन्यांची किंमत ७२ लाख तकी होती.त्यांच्या लोकसेवेच्या कालावधीतील वैध उत्पन्नापेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.. भ्रष्टाचाार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सुपे हे सध्या सेवानिवृत्त आहते.
सांगली जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे (वय ५९ वर्षे) त्यांच्या पत्नी जयश्री विष्णू कांबळे (दोघेही राहणार, शिवाजीनगर बार्शी) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाल्याची माहिती पुढे येत आहे.