‘ घरोघरी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी’ या अभियानाची सुरुवात कोल्हापुरात सुरुवात

कोल्हापूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी व प्रदेशाध्यक्ष आम. जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार “घरोघरी राष्ट्रवादी” या संकल्पनेतून राज्यस्तरावर अभियान राबवण्यात येत आहे. त्याची सुरुवात जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या मार्गदर्शनातून कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रतिभा नगरातील नवश्या मारुती मंदिरापासून करण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष आर.के.पोवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यां सोबत घरोघरी जाऊन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे विचार व राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक जीवनात केलेली कामे व उपक्रमांची माहिती दिली तसेच पक्षा मार्फत देण्यात आलेले ‘ मी महाराष्ट्रवादी’ नावाचे स्टीकर त्यांच्या घराच्या मुख्य दर्शनी भागावर लावण्यात आले.
यावेळी नवश्या मारुती , पोवार गल्ली, शाहूनगर चौक, व इतर गल्ल्या असे तीनशे ते चारशे घरापर्यंत हे अभियान पोहोचवण्यात आले. त्याला या भागातील लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या अभियानात या भागातील अनेक युवक, महिला, नागरिक मोठ्या प्रमाणात सामील झाले होते.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी अनिल घाटगे, नितीनभाऊ पाटील, महादेव पाटील, नागेश जाधव, गणेश नलवडे, यांनी परिश्रम घेतले.

यावेळी रामराजे कुपेकर, पद्मजा तिवले, सुनील देसाई, उमेश पोवार, गणेश जाधव,निलेश मछले, मुसाभाई कुलकर्णी, फिरोज सरगुर, सादिक आतार, अरुणा पाटील, सरोजिनी जाधव, फिरोज खान उस्ताद, राजेंद्र ओंकार, राजू मालेकर, राजवर्धन यादव, नागेश परांडे, अमोल जाधव, नितीन पेंटर, आदित्य नीलकंठ, पप्पू जाधव, अनिल कलकुटकी, गणपत पोवार, चंद्रकांत नलवडे, बंटी नलवडे, सिद्धार्थ घोडेराव, हर्ष साळोखे, रियाज आतार ,संदीप घाटगे , भूषण पोतदार, निवास गायकवाड, गौरव कांबळे, महेश नलवडे ,सनी गायकवाड, संदीप साळोखे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.