डी.वाय.पाटील अभियांत्रिकी मध्ये “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस” उत्साहात

कसबा बावडा(वार्ताहर) : कसबा बावडा येथील डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात “राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला. केमिकल इंजिनिअरिंग विभाग व इन्स्टिट्यूट इन्होवेशन कौन्सिल (आयआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांनी कसबा बावड्यातून हातात विविध संदेश देणारे घोषणापत्रे घेऊन जनजागृती फेरी काढत समाज प्रबोधन केले. डी.वाय.पाटील समूहाचे कार्यकारी संचालक डॉ.अनिलकुमार गुप्ता यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

२१ वे शतक देशभरात औद्योगिक क्रांतीसाठी ओळखले जात आहे. मात्र, पर्यावरण, सजीव सृष्टी यांना कोणत्याही प्रकारची हानी न पोचता आपल्या संशोधनातून नावीन्यपूर्ण पर्यावरणपूरक प्रक्रिया निर्माण करणे हे उद्योग जगतासमोर आव्हान आहे. त्याचमुळे दिवसेंदिवस केमिकल इंजिनिअरिंग शाखेचे महत्व वाढत आहे असे प्रतिपादन डॉ गुप्ता यांनी यावेळी केले.

विभाग प्रमुख डॉ.के. टी जाधव म्हणाले, प्रदूषणमुक्त प्रक्रिया, जैविक इंधने, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत आणि संसाधने, हरित हायड्रोजन याद्वारे येणाऱ्या काळात केमिकल इंजिनिअरिंग शाखेचे पर्यावरणपूरक प्रक्रिया निर्मितीसाठी अमूल्य योगदान राहील. केमिकल शाखा ते आव्हान लीलया पार पाडेल असा विश्वास आहे.

या प्रसंगी, केमिकल इंजिनियरिंग विभागाची सव्वाशेहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. सदर उपक्रमाचे संयोजन केमिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख, डॉ. के. टी.जाधव आणि प्रा. पूनम मंडले यांनी केले होते. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ.लितेश मालदे, डॉ. अमरसिंह जाधव, डॉ. राहुल पाटील, डॉ. राहुल महाजन, प्रा. किरण पाटील, प्रा. पूनम मंडले, प्रा.प्रियांका पाटील आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील,
पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

कसबा बावडा: राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनानिमित्त जनजागृती रॅलीचा शुभारंभ करताना डॉ ए के गुप्ता, डॉ संतोष चेडे, डॉ. लीतेश मालदे, डॉ के. टी .जाधव आदी