राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कोणाचा दावा ; आज होणार सुनावणी…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचं यावर निवडणूक आयोगात आज सुनावणी पार पडणार आहे. आजही आयोगात शरद पवार यांच्याच गटाकडून युक्तिवाद केला जाणार आहे. सायंकाळी 4 वाजल्यापासून युक्तिवादाला सुरूवात होणार असून शरद पवार गटाचे वकिल देवदत्त कामत आज युक्तिवाद करणार आहे.मागच्या सुनावणीवेळी शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड कशी योग्य आहे हे आयोगासमोर सांगितलं होतं.

 शरद पवार यांची जेंव्हा सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड चुकीची होती, असा दावा अजित पवार यांच्या युक्तिवादादरम्यान केला होता. त्याला शरद पवार यांच्या गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देत ती निवड बेकायदेशीर होती तर मग तेंव्हाच तुम्ही दाद का मागितली नाही असा सवाल उपस्थित केला होता.सोबतच अजित पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावर दावा करण्याच कार्य म्हणजे विश्वासघातकी प्रकारातील असल्याचा युक्तिवाद केला होता. माध्यमांमध्ये सुनावणी लवकर संपवून निकाल लागेल हे अजित पवार यांच्या गटाकडून सांगितलं गेल्याच्या दाव्यावरही कामत यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर आयोगाने नाराजी व्यक्त करत दोन्ही गटांना माध्यमांशी बोलताना काळजी घ्यायला सांगण्यात आलं होतं.

तर, आजच्या सुनावणीसाठी शरद पवार गटाकडून स्वता: शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, खा. वंदना चव्हाण, आ. जितेंद्र आव्हाड, आ. सुनिल भुसारा उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. तर, अजित पवार यांच्या गटाकडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, समिर भुजबळ, सुरज चव्हाण उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

🤙 8080365706